कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून ‘गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र’ या मागणीसाठीचा धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्चा स्थगित !

धुळे – गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्च्याचे आयोजन गोरक्षक जनआंदोलनाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते; परंतु महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून हा पदमोर्चा स्थगित करण्यात आला. पुढील १५ दिवसांत शासन, प्रशासन यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास ११ मार्चला आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेद्वारे घोषित करण्यात आले. या पत्रकार परिषदेला सर्वश्री संजय शर्मा, डॉ. योगेश पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, राजीवकृष्ण झा महाराज, किशोर अग्रवाल, हर्षल गवळी, राहुल क्षीरसागर, रोहित विभांडीक यांसह गोरक्षक उपस्थित होते.