‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी चीनचा भारताला पाठिंबा !

बीजिंग (चीन) – भारताने ‘ब्रिक्स’चे शिखर परिषदेचे यजमानपद स्वीकारण्यास चीनचा पाठिंबा आहे, अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी दिली. ‘ब्रिक्स’मध्ये ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा सहभाग आहे.

‘चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शिखर परिषदेला उपस्थिती रहाणार आहेत का ?’ त्याविषयी वांग यांनी कोणतेही भाष्य केले नाही. पँगाँग तलावाजवळून भारत आणि चीन यांनी त्यांचे सैन्य मागे घेण्यास प्रारंभ केल्यानंतर चीनने भारताला पाठिंबा दर्शवला आहे.