मोर्ले येथे हत्तीच्या आक्रमणात युवक गंभीर घायाळ

मोर्ले येथील शेतकरी विश्‍वनाथ सुतार काजूच्या बागेत गेले होते. तेव्हा अचानक आलेल्या हत्तीने सुतार यांच्यावर आक्रमण करत त्यांना उचलून आपटले. यामध्ये सुतार गंभीर घायाळ झाले.

गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याच्या दोन्ही ठिकाणच्या जनसुनावणीच्या वेळी गदारोळ

गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याची रवींद्र भवन, मडगाव आणि कला अकादमी, पणजी अशी दोन्ही ठिकाणी ७ मार्चला जनसुनावणी झाली. या दोन्ही ठिकाणी जनसुनावणीच्या वेळी नागरिकांनी गदारोळ घातला

कर्नाळा बँक आर्थिक घोटाळा प्रकरणाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष का ? -आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधीमंडळात प्रश्‍न

कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ५१२ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्‍न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात उपस्थित केला.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोट्यवधी रुपयांची घरपट्टी बुडवली ! – धनंजय महाडिक यांचा आरोप

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मिळकतींची वर्ष १९९७ पासून घरपट्टी थकित असून आजपर्यंत दंडाच्या व्यतिरिक्त ९१ लाख ६३ सहस्र २५२ रुपये इतकी रक्कम बुडवली आहे, असा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी ६ मार्च या दिवशी पत्रकार बैठकीत केला.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

‘कोरोनामुळे मागील १ वर्षाचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अजूनही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आमची प्राथमिकता असणार आहे’, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

यंदा मुंबईसह कोकणात तीव्र उन्हाळा ! – हवामान खाते

राजस्थान आणि गुजरात येथून उष्ण वारे मध्य भारताकडे वहात आहेत. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील तापमानातही वृद्धी झाली आहे. अकोला आणि चंद्रपूर येथे उष्णतेची चेतावणी (‘हिट अलर्ट’) देण्यात आली आहे.

व्यवस्थेतील त्रुटी !

जनतेने अशा प्रसंगात काय केले पाहिजे, काय करू नये हे पोलीस आणि प्रशासन यांनी सांगितले पाहिजे. गोपनीय माहिती वगळता प्रतिदिनच्या तपासातील प्रगती जनतेपुढे मांडली पाहिजे, तरच जनतेचा कायदा आणि सुव्यवस्था यांवरील विश्‍वास टिकून राहील.

देहली आणि केरळ येथील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवा ! – हिंदुत्वनिष्ठांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

हत्यांमागील सूत्रधार, त्यांना साहाय्य करणारे धर्मांध आणि ही प्रकरणे दाबणारे पोलीस अन् राजकारणी यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली.

परळी (बीड) येथील वैद्यनाथ महाशिवरात्री महोत्सव रहित !

कोरोनाच्या संसर्गामुळे येथील बारा ज्योतिर्लिंगांतील एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री महोत्सव रहित करण्यात आला असून ८ ते १६ मार्च या कालावधीत वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातील सर्व शिवालये भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत.

(म्हणे) ‘गेल्या १ सहस्र २०० वर्षांपासून बंगालमध्ये गोहत्या होत असतांना ती कुणीही रोखू शकत नाही !’

बंगालचे धर्मांध मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी हे हेतूपुरस्सर असे वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. केंद्रसरकारने संपूर्ण देशात गोहत्याबंदी केली, तरच सिद्दीकुल्लाह यांच्यासारखे धर्मांध वठणीवर येतील !