मुंबई – या वर्षी मुंबईसह कोकणामध्ये उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तीव्र असणार असल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. जयंत सरकार यांनी दिली.
मुंबईतील सरासरी तापमान हे ३३ अंश सेल्सिअसपर्यंत असते. मुंबईसह कोकणामध्ये ५ ते ११ मार्च या कालावधीत २ अंश सेल्सिअसपर्यंत अधिकची वृद्धी होण्याची शक्यता आहे. उकाड्यापासून वाचण्यासाठी पाण्याची बाटली आणि उन्हापासून वाचण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
राजस्थान आणि गुजरात येथून उष्ण वारे मध्य भारताकडे वहात आहेत. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील तापमानातही वृद्धी झाली आहे. अकोला आणि चंद्रपूर येथे उष्णतेची चेतावणी (‘हिट अलर्ट’) देण्यात आली आहे.