हिंदु जनजागृती समितीचे वाराणसी येथील जिल्हाधिकार्यांना निवेदन
वाराणसी – गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावरील प्राणघातक आक्रमणांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नुकत्याच देहली आणि केरळ येथील हिंदूंच्या हत्या झाल्या. या हत्यांमागे एक सुनियोजित षड्यंत्र असल्याचे दिसून येते. या प्रकरणांमधील गुन्हेगार विविध अन्वेषण यंत्रणांना ज्ञात असतांना संबंधित राज्य सरकारकडून या प्रकरणी ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या हत्यांमागील सूत्रधार, त्यांना साहाय्य करणारे धर्मांध आणि ही प्रकरणे दाबणारे पोलीस अन् राजकारणी यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली. यासाठी समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकार्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
या वेळी राष्ट्रीय मानवाधिकार आणि न्याय परिषद वाराणसीचे महासचिव अधिवक्ता अरुण कुमार मौर्य, हिंदु जागरण मंचचे जौनपूर जिल्हा महामंत्री अधिवक्ता अनुराग पांडे, हिंदु जागरण मंचचे वाराणसी महानगर मंत्री अधिवक्ता विकास तिवारी, अधिवक्ता मदन मोहन यादव, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता मुकेश मिश्रा, अधिवक्ता रवि प्रकाश श्रीवास्तव, अधिवक्ता संदीप कुमार सिंह, अधिवक्ता श्याम वर्मा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केशरी आदी उपस्थित होते.
अन्य मागण्या
१. या प्रकरणांचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात यावे. आवश्यकता पडल्यास केंद्रीय स्तरावर एका विशेष समितीचे गठण करावे.
२. देशभरातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना तात्काळ राज्य आणि राज्याबाहेर संरक्षण देण्याचे आदेश केंद्र सरकारने द्यावेत.