मुंबई – राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा प्रत्यक्ष (ऑफलाईन) घेण्यात येणार आहेत, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले. याविषयी सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सूत्र उपस्थित केले होते.
‘कोरोनामुळे मागील १ वर्षाचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अजूनही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आमची प्राथमिकता असणार आहे. बोर्डाच्या परीक्षांविषयी अनेकांनी काही सूचना आणि मागण्या दिल्या आहेत. त्यात काही गोष्टींची आवश्यकता असल्यास तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन योग्य तो निर्णय घेऊ’, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.