दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विषारी अन्नपदार्थ खाऊन ३ श्वानांचा मृत्यू !; अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा अटकेत !…

रस्त्यावर फेकलेले विषारी अन्नपदार्थ खाल्याने पवईत ३ श्वानांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुणे येथे लाच स्वीकारतांना एकाला अटक !

एका ४२ वर्षीय व्यक्तीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी ‘सायबर विभागा’कडे ऑनलाईन तक्रार प्रविष्ट (दाखल) झाली होती. त्याचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्याकडे आहे. 

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून एकाने लाच मागितली !

लाचखोरांवर त्याच वेळी कठोर कारवाई न केल्याने असे गंभीर गुन्हे पुन: पुन्हा घडत आहेत. भ्रष्ट पोलीस यंत्रणा कधी सुधारणार ?

ठाकरे गटाचे राजन साळवी यांची उच्च न्यायालयात याचिका

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. पत्नी आणि मुलगा यांच्यावरील गुन्हे रहित होण्यासाठी किंवा त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी ते उच्च न्यायालयात गेले आहेत.

तहसीलदारांसाठी लाच स्वीकारतांना महसूल विभागातील २ जणांना रंगेहात पकडले !

प्रशासकीय विभागात सर्वच जण एकाच माळेतील असतील तर देश भ्रष्टाचारमुक्त कधीतरी होईल का ? अशांना कठोर शिक्षा त्वरित व्हायला हवी !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या लेखाधिकार्‍याला ६ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना अटक !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा वित्त आणि लेखा अधिकारी सिद्धेश्‍वर शिंदे याला ६ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे लाचखोर कर्मचारी कह्यात !

डोंबिवली येथील श्रीधर म्हात्रे चौकात महानगरपालिकेच्या क्रीडांगणाच्या आरक्षणावर वसंत हेरिटेज ही बेकायदेशीर इमारत आहे.

भिवंडी येथील लाचखोर साहाय्यक पोलीस निरीक्षक कह्यात !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.

१३ सहस्र रुपयांची लाच घेतांना मंडल अधिकारी आणि तलाठी यांना रंगेहात पकडले !

१३ सहस्र रुपयांची लाच घेतांना फलटण येथील मंडल अधिकारी जितेंद्र कोंडके आणि सजा फलटणच्या तलाठी श्रीमती रोमा कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. 

ACB Seized 100Crores TelanganaOfficial : सरकारी अधिकारी शिव बालकृष्ण यांच्याकडून तब्बल १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त !

भ्रष्टाचारातून एवढी अवाढव्य रक्कम जमा होईपर्यंत पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ?