पुढील कारवाईसाठी महासंचालकांकडे अनुमती !

पुणे – शहराचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) त्यांच्या मालमत्तेची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी सुधीर आल्हाट यांनी आरोप आणि तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर एसीबीकडून चौकशी करण्यात आली आहे. अमिताभ गुप्ता यांचा मुंबईतील सांताक्रूझमध्ये पंचतारांकित फ्लॅट, पुण्यातील अॅमनोरा टॉवरमध्ये आलिशान व्हिला असल्याचे उघड झाले आहे. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे प्राथमिक अन्वेषणातून उघड झाले आहे. त्यामुळे ‘एसीबी’ने महासंचालकांकडे अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी अर्ज करून अनुमती मागितली आहे.
भाजपचे सुधीर आल्हाट यांनी ‘माहितीचा अधिकार’अंतर्गत अमिताभ गुप्ता यांच्याविषयीची माहिती मागितली होती. यामध्ये उघड झालेल्या माहितीतून पुणे आणि मुंबई येथील मालमत्तेची माहिती समोर आली आहे.