भिवंडीत २ पोलीस अधिकार्‍यांना लाच घेतांना अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ५० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या २ अधिकार्‍यांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (‘एसीबी’च्या) पथकाने अटक केली. साहायक आयुक्त सुनील भोईर आणि प्रभारी बीट निरीक्षक अमोल वारघडे अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकार्‍यांची नावे आहेत.

भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये ४ मजली इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे साहायक आयुक्त सुनील भोईर यांनी सांगितले होते. इमारत बांधणार्‍या व्यावसायिकाने भोईर यांची भेट घेतली. त्या वेळी कारवाई न करण्यासाठी या व्यावसायिकाकडे त्यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली.

संपादकीय भूमिका

  • रक्षक नव्हे, तर भ्रष्ट भक्षक बनलेले पोलीस खाते !

  • पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय ! असे भ्रष्ट पोलीस हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !