सातारा, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – एका गुन्ह्यामध्ये साहाय्य करण्यासाठी आणि पुन्हा मद्य विक्रीचा उद्योग चालू करून देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकाने ३ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. कराड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला खासगी व्यक्तीसह लाच स्वीकारतांना विभागाने रंगेहात पकडले. भीमराव शंकर माळी, असे कराड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षकाचे नाव असून मुस्तफा मोहिदिन मणियार असे त्यांच्या खासगी साहाय्यकाचे नाव आहे.
संपादकीय भूमिकाकुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! |