शिरूर (पुणे) प्रांत कार्यालयातील लाचखोर महिला वरिष्ठ कारकून अटकेत !

  • १ लाख ६० सहस्र रुपयांची लाच मागितली

  • भ्रष्टाचाराने पोखरलेले महाराष्ट्रातील महसूल खाते !

शिरूर (पुणे) – धरणग्रस्त शेतकर्‍यांकडून १ लाख ६० सहस्र रुपयांची लाच घेतांना शिरूर प्रांत कार्यालयातील महिला वरिष्ठ कारकून सुजाता बडदे आणि खासगी व्यक्ती तानाजी मारणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित दोघांना अटक केली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.

तक्रारदारांची टेमघर धरणामध्ये जागा गेल्याने सरकारकडून शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे भूमी आणि घरासाठी २ गुंठे भूखंड दिलेला आहे. तक्रारदारांच्या कुटुंबातील ४ आणि सख्ख्या भावाच्या कुटुंबातील ४ असे ८ प्रस्ताव प्रांत कार्यालयात प्रलंबित होते. ते प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडून संमत करण्यासाठी प्रत्येक प्रस्तावास ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

संपादकीय भूमिका

एकेका प्रस्तावासाठी ५० सहस्र रुपयांची लाच मागणे म्हणजे कर्तव्यचुकार वृत्तीने गाठलेली परिसीमाच होय !