प्राप्तीकर विभागाचे निरीक्षक प्रताप चव्हाण १० लाख रुपयांची लाच घेतांना कह्यात

एका आधुनिक वैद्यांकडून धाड न टाकण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतांना प्राप्तीकर विभागाचे निरीक्षक प्रताप चव्हाण यांना लक्ष्मीपुरी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले. 

राजस्थानच्या लाचलुचपत खात्याच्या उपअधीक्षकालाच लाच घेतांना रंगेहात अटक

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक भैरूलाल मीणा यांनाच ८० सहस्र रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली.

ठाणे महानगरपालिकेतील स्थावर मालमत्ता विभागातील लाचखोर लिपीक कह्यात

तक्रारदार दलालाने मानपाडा येथील ‘दोस्ती इम्पेरियर’ या गृहसंकुलातील सदनिका बारमध्ये काम करणार्‍या मुलीला घेऊन दिली होती. त्याच्यावर नियमानुसार कारवाई न करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतील स्थावर मालमत्ता विभागातील लिपीक हेमंत गायकवाड (वय ३३ वर्षे) यांनी १० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍याला लाच स्वीकारतांना कह्यात घेतले

भ्रष्ट अधिकार्‍यांना कह्यात घेणे, चौकशी करणे आदी जुजबी कारवाई करून न थांबता अशा भ्रष्टाचार्‍यांकडून भ्रष्टाचाराचा सर्व पैसा वसूल करावा !