
१. अधिवक्ता श्रीकृष्ण त्र्यंबकराव देशपांडे, मु.पो. आष्टी, जिल्हा बीड
अ. ‘आश्रमाचे बांधकाम सुरेख आहे. मला सात्त्विकतेची पूर्ण अनुभूती आली.
आ. ‘हिंदु संस्कृती संरक्षण आणि कार्य उभारणी’ यांचे मला प्रत्यक्ष दर्शन झाले.
इ. ‘आश्रमातील साधकांमध्ये अतिशय आदरभाव असून ते अतिथींची सेवा उत्कृष्टपणे करत आहेत’, असे मला जाणवले.’
२. कु. वैष्णवी श्रीकृष्ण देशपांडे, (अधिवक्ता देशपांडे यांची मुलगी, विधीचे (कायद्याचे) शिक्षण घेत आहे.)
अ. ‘साधकांनी ‘सनातन आश्रमात सेवा आणि साधना कशा प्रकारे होते ?’, याविषयी चांगल्या प्रकारे माहिती दिली.
आ. हा आश्रम हे हिंदूंचे धार्मिक केंद्र असून येथे भारतीय परंपरेचा सारांश अतिशय उत्तम पद्धतीने मांडलेला आहे.
इ. आश्रमात अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. ‘पुनःपुन्हा यावे’, असे वाटणारे हे एक ठिकाण आहे.’
३. श्री. देवनन्दन कुमार वर्णवाळ, विश्व हिंदु परिषद, रांची, झारखंड.
अ. ‘मला आश्रम पाहून पुष्कळ चांगले वाटले. आश्रमातील वातावरण पुष्कळ सात्त्विक आहे.
आ. ‘भावी पिढीला हिंदु धर्माची माहिती व्हावी’, यासाठी साधकांचे जोमाने प्रयत्न चालू आहेत.
इ. आश्रमात पुष्कळ साधक आहेत. येथील सर्व साधकांना पाहून आणि काही साधकांना प्रत्यक्ष भेटून माझे मन प्रसन्न झाले.’
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेला अभिप्राय
१. ‘सूक्ष्म जगताविषयीच्या प्रदर्शनामागील संकल्पना आणि उद्देश अतिशय सत्य घटनेवर आधारित आहेत. त्यामुळे ते मनाला पुष्कळ भावले.’
– कु. वैष्णवी श्रीकृष्ण देशपांडे
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १७.१२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |