
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘मनुष्याच्या देहाचे स्थूलदेह, प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह असे प्रकार आहेत. यांपैकी कोणत्या देहात सप्तचक्रे आणि त्याच्याशी संबंधित इडा, पिंगला अन् सुषुम्ना नाड्या असतात ?
उत्तर : सप्तचक्रे आणि इडा, पिंगला अन् सुषुम्ना या नाड्या हे सर्व स्थूलदेहात सूक्ष्म स्तरावर शक्ती स्वरूपात कार्यरत असतात. सप्तचक्रे ही दैवी शक्तींची स्थाने असून इडा, पिंगला आणि सुषुम्ना या कुंडलिनी नाड्या दैवी शक्ती प्रवाहित करणार्या शक्तीवाहिन्या आहेत.

१ अ. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ३० ते ६९ टक्के असेपर्यंत तिच्या सप्तचक्रांशी आवश्यकतेनुसार इडा किंवा पिंगला नाड्या जोडल्या जाणे : व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीनुसार तिच्यावर इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तिन्ही नाड्यांचा सूक्ष्म स्तरावरील परिणाम पुढीलप्रमाणे होतो.
१ अ १. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ३० ते ६९ टक्के असतांना तिच्या सप्तचक्रांशी आवश्यकतेनुसार इडा किंवा पिंगला नाड्या जोडल्या गेल्याने सूक्ष्म स्तरावर होणारा लाभ : सप्तचक्रे ही व्यक्तीच्या सुषुम्ना नाडीवर स्थित असतात. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ३० ते ६९ असेपर्यंत जेव्हा तिला साधना करण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जेची आवश्यकता असते, तेव्हा तिच्या सप्तचक्रांशी इडा, म्हणजे चंद्रनाडी जोडली जाऊन तिच्याकडे ईश्वराची तारक शक्ती आणि सगुण स्तरावरील चैतन्य आकृष्ट होते. त्याचप्रमाणे व्यक्तीचा रजोगुण न्यून करण्यासाठीही व्यक्तीच्या सप्तचक्रांशी इडा नाडी जोडली जाऊन तिच्यातील रजोगुण न्यून होण्यास साहाय्य होते. त्याचप्रमाणे जेव्हा व्यक्तीला साधनेतील अडथळ्यांवर मात करायची असते, तेव्हा तिच्या सप्तचक्रांशी पिंगला, म्हणजे सूर्यनाडी जोडली जाऊन तिच्याकडे मारक शक्ती आणि सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्य आकृष्ट होते. त्याचप्रमाणे व्यक्तीचा तमोगुण न्यून करण्यासाठीही व्यक्तीच्या सप्तचक्रांशी पिंगला नाडी जोडली जाऊन तिच्यातील तमोगुण न्यून होण्यास साहाय्य होते. जेव्हा व्यक्ती अंतर्मुख होऊन तिचे ईश्वराशी अनुसंधान वाढते, तेव्हा तिची सुषुम्ना नाडी जागृत होऊन तिची कुंडलिनीशक्ती मूलाधार ते सहस्रार अशा ऊर्ध्व दिशेने (वरच्या दिशेने) प्रवाहित होते. त्या वेळी व्यक्तीची सात्त्विकता वाढून तिच्यामध्ये ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे परिणामस्वरूप तिची आध्यात्मिक उन्नती होऊन तिची आध्यात्मिक पातळी वाढू लागते.
१ अ २. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ७० टक्के किंवा त्याहून अधिक असतांना तिच्या सप्तचक्रांशी आवश्यकतेनुसार इडा किंवा पिंगला नाड्या जोडल्या गेल्याने सूक्ष्म स्तरावर होणारा लाभ : जेव्हा व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ७० टक्के किंवा त्याहून अधिक असते, तेव्हा तिचा प्रवास पिंडी ते ब्रह्मांडी चालू होतो; म्हणजे व्यक्तीचे कार्य व्यष्टी स्तरावरून समष्टी स्तराकडे चालू होते. त्या वेळी जेव्हा समष्टीला, म्हणजे साधक, धर्माभिमानी, जिज्ञासू इत्यादींना साधनेविषयी मार्गदर्शन करून त्यांच्या साधनेला गती देण्याची आवश्यकता असते, तेव्हा व्यक्तीच्या सप्तचक्रांशी इडा नाडी जोडली जाते. त्यामुळे व्यक्तीची सप्तचक्रे, स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह (प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह) यांतून समष्टीकडे तारक शक्ती आणि सगुण स्तरावरील चैतन्य प्रक्षेपित होते. जेव्हा समष्टीवर वाईट शक्ती आक्रमणे करतात किंवा वातावरणातील रज-तम यांच्या प्रभावामुळे सूक्ष्मातून त्रासदायक आवरण निर्माण होते, तेव्हा व्यक्तीच्या सप्तचक्रांशी सूर्यनाडी जोडली जाऊन तिची सप्तचक्रे, स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह (प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह) यांतून समष्टीकडे मारक शक्ती आणि सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्य प्रक्षेपित होते. जेव्हा व्यक्ती समष्टीतील भगवंताच्या व्यापक रूपाशी जोडली जाते, तेव्हा तिची सुषुम्ना नाडी जागृत होऊन तिच्या कुंडलिनीशक्तीचा प्रवाह सहस्रारचक्राकडून मूलाधारचक्राकडे चालू होतो. यालाच ‘ब्रह्मांडी ते पिंडी असा प्रवास करणे’, असे संबोधले जाते. त्यामुळे व्यक्तीकडून समष्टीसाठी आवश्यक असणार्या तारक-मारक शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या विविध घटकांच्या सूक्ष्म लहरींचे प्रक्षेपण होऊन समष्टी स्तरावर व्यक्ती, स्थान आणि वायूमंडल यांची शुद्धी होऊ लागते. यालाच ‘संतांचे अस्तित्वाच्या स्तरावर कार्य होणे’, असे म्हणतात. त्यामुळे धर्मप्रसाराच्या कार्याला आणि शिष्य, साधक, धर्माभिमानी, जिज्ञासू इत्यादींच्या व्यष्टी-समष्टी साधनेला चालना मिळते.’ (क्रमशः)
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०२४)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/897326.html
|