‘७.६.२०२४ या दिवशी पू. (श्रीमती) निर्मला दाते (सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत, वय९२ वर्षे) यांना मेंदूच्या विकाराचा झटका (स्ट्रोक) आला. त्यामुळे त्यांचे शरीर सुन्न झाले. तेव्हापासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्यासाठी नामजपादी उपाय केले. या उपायांचे देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्म परीक्षण करता आले. ते येथे दिले आहे.

१. १५.६.२०२४ या दिवशी जाणवलेली सूत्रे
अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पू. दातेआजी यांच्या खोलीत येण्यापूर्वी पू. आजींच्या शरिराभोवती पांढर्या रंगाचे गोल आकारातील सुरक्षाकवच होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पू. आजींच्या खोलीत आल्यावर पू. आजींच्या भोवतीचे सुरक्षाकवच आणखी मोठे झाले.
आ. पू. आजींच्या शरिरात पांढर्या आणि निळ्या या रंगांचे दैवी प्रकाश सूक्ष्मातून दिसत होते.
इ. पू. आजींच्या चरणांपासून कमरेपर्यंत सूक्ष्मातून पहातांना माझ्या मनाला ईश्वरी आनंद होत होता, तर कमरेपासून मस्तकापर्यंत पहातांना माझ्या मनाला ईश्वरी शांतता जाणवत होती.
ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींच्या शरिरापासून काही अंतरावर उजव्या हाताची बोटे खालून वर फिरवली. तेव्हा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बोटांतून उदबत्तीचा धूर बाहेर पडतांना दिसतो, तसे पांढरे चैतन्य बाहेर पडून ते पू. आजींच्या पेशीपेशींमध्ये जाऊन त्यांना ऊर्जा प्रदान करत आहे’, असे मला जाणवले.

२. १६.६.२०२४ या दिवशी जाणवलेली सूत्रे
अ. पू. आजींच्या शरिरात मागील एका कर्मदोषामुळे सूक्ष्मातून काळ्या केसांप्रमाणे रज-तम सिद्ध झाले आहे. त्यामुळे पू. आजींना विविध शारीरिक त्रास होत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्यामुळे या सूक्ष्म काळ्या केसांचा आकार तुटक दिसू लागला. याचा अर्थ पू. आजींच्या कर्मदोषाचा प्रभाव न्यून झाला.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्याने पाताळातील अनिष्ट शक्तींची त्रासदायक शक्ती काही प्रमाणात नष्ट होत होती. पाताळातील या सूक्ष्म युद्धामुळे मला फटाके फुटतात, तसे आवाज सूक्ष्मातून ऐकू येऊ लागले.
इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नामजपादी उपायांमुळे पू. आजींची कुंडलिनीचक्रे प्रकाशमान दिसू लागली.
प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीचा लाभ करून घ्या !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुढे येणार्या घोर आपत्काळात वैद्यकीय उपचार मिळणे दुरापास्त होणार आहे’, हे ओळखून मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली आहे. या उपायपद्धतीद्वारे व्याधीग्रस्त व्यक्ती कुणाचेही साहाय्य न घेता स्वतःची व्याधी दूर करण्याचा प्रयत्न करू शकते किंवा उन्नत साधकही अन्य आजारी व्यक्तीसाठी या उपायपद्धतीद्वारे त्याची व्याधी दूर होण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. त्यांच्या या गंभीर आजारपणात आधुनिक वैद्य त्यांच्यावर औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय आणि काही प्रयोगही करवून घेतले. उपायपद्धतीमुळे काय फरक जाणवतो ? याचाही अभ्यास केला. या प्रयोगातून आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ साधक आणि समाज यांना शिकता येईल, तसेच या उपचारपद्धतीचे महत्त्वही यातून अधोरेखित होईल, या दृष्टीने ही लेखमाला येथे प्रसिद्ध करत आहोत.
– संपादक
३. १७.६.२०२४ या दिवशी जाणवलेले सूत्र
परात्पर गुरु डॉक्टरांच्या हातातून प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्यापैकी काही ईश्वरी ऊर्जा पू. आजींच्या कुंडलिनीचक्रांत आणि काही ईश्वरी ऊर्जा त्यांच्या शरिरात पसरून कार्य करत होती.
४. १८.६.२०२४ या दिवशी जाणवलेली सूत्रे
४ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि एका साधकाने पू. आजींना नमस्कार केल्यावर पू. आजींच्या श्वासाची गती वाढण्यामागील आध्यात्मिक कारण : प्रथम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आणि त्यानंतर साधकाने (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) पू. आजींच्या चरणांचे दर्शन घेतले. दोन्ही वेळा पू. आजींच्या श्वासाची गती वाढली. त्यामागील आध्यात्मिक कारण असे, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी नमस्कार केला, तेव्हा त्यांच्याकडून पू. आजींना चैतन्य मिळाले. याचा परिणाम पू. आजींच्या शरिरावर झाल्याने त्यांच्या श्वासाची गती वाढली. साधकाने पू. आजींना नमस्कार केला, तेव्हा पू. आजींकडून श्री. भानु यांना चैतन्य मिळाले. याचा परिणाम पू. आजींच्या शरिरावर झाल्याने त्यांच्या श्वासाची गती वाढली.’

५. १९.६.२०२४ या दिवशी जाणवलेले सूत्र
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. दातेआजी यांच्याकडे काही वेळ सलग पाहिले, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून वेटोळ्याच्या (स्पायरल) आकारातील चैतन्य पू. दातेआजींना प्राप्त होत होते. त्या वेळी पू. आजींच्या श्वासाची गती वाढत होती.
६. २०.६.२०२४ या दिवशी जाणवलेली सूत्रे
अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हाताची बोटे पू. आजींच्या चरणांपाशी धरली, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातातून लाल रंगाची दैवी ऊर्जा पू. आजींना प्राप्त झाली.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पू. आजींसाठी करत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांमुळे पू. आजींची कुंडलिनीचक्रे प्रकाशमान दिसू लागली.
इ. पू. आजींचे आज्ञाचक्र सूक्ष्मातून पिवळ्या रंगाचे दिसत होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींकडे पाहिल्यावरपू. आजींच्या आज्ञाचक्रावरील पिवळ्या रंगाच्या दैवी ऊर्जेत वाढ झाली.
ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींच्या डोक्यापासून काही अंतरावर काही वेळ हात धरला, तेव्हा पू. आजींच्या चरणांची आपोआप हालचाल झाली. त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांच्या हातातून प्रक्षेपित होत असलेली ईश्वरी ऊर्जा काही क्षणांतच पू. आजींच्या चरणापर्यंत पोचली. त्यामुळे पू. आजींच्या चरणांची हालचाल झाली’, असे मला जाणवले.
उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सौ. ज्योती दाते(पू. आजींची थोरली सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे) यांना पू. आजींसाठी ‘श्री आकाशदेवाय नमः ।’ हा जप करण्यास सांगितला. तेव्हा ‘त्या नामजपातून पाण्याच्या थेंबांच्या आकाराचे चैतन्य निर्माण होऊन ती दैवी ऊर्जा पू. आजींना मिळत होती’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०२४)
|