
१. तरुणांना लाजवेल, अशी सेवा करणारे वयस्कर साधक
अ. ‘देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करणारे काही साधक वयस्कर आहेत, तरीही ते तरुणांना लाजवेल, अशी उत्साहाने आणि मनापासून सेवा करतात.
आ. ते साधक सेवेच्या ठिकाणची स्वच्छता करणे, अल्पाहार सेवेची पूर्वसिद्धता करणे आणि भोजनानंतर पटल आवरणे, यांसारख्या सेवांमध्ये उत्साहाने सहभागी होतात.
इ. ते साधक आश्रम स्तरावरील सेवेतही सहभागी असतात, तरीही सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा वेळेतच पूर्ण होतात.
ई. सात्त्विक उत्पादनांची मागणी अधिक असल्यास प्रत्येक साधकाची आनंदाने अतिरिक्त वेळ देण्याची सिद्धता असते.
उ. संध्याकाळी सर्व जण नित्यनियमाने एकत्रित व्यायाम करतात.
२. सेवेच्या ठिकाणी असणारी आदर्श कार्यपद्धत !
अ. सेवेच्या ठिकाणी ‘चहुबाजूंनी देव माझ्याकडे पहात आहे. माझ्या प्रत्येक कृतीची नोंद घेत आहे’, असे फलक लावले आहेत.
आ. सेवेच्या ठिकाणी प्रत्येक वस्तू जागेवर ठेवलेली असते.
इ. साधकांना काही अडचण आल्यास उत्तरदायी साधिकांकडून ती अडचण तत्परतेने सोडवली जाते. उत्तरदायी साधकांचे सर्व सेवांकडे बारकाईने लक्ष असते.
ई. सेवेच्या ठिकाणी चैतन्य जाणवते.’
– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.१०.२०२४)