
एक साधक : काही दिवसांपासून किंवा काही मासांपासून असे होते की, ‘माझ्या मनात एखादा विचार येतो, उदा. एखाद्याचे नामकरण असे करायला पाहिजे.’ अलीकडेच माझ्या पुतणीला मुलगा झाला. तेव्हा ‘त्याचे नाव ‘अमूक’ ठेवायला हवे’, असे माझ्या मनात आले आणि त्यांनी बाळाचे नाव नेमके तेच ठेवले. अशा २ घटना झाल्या. माझ्या मनात एखादा विचार आला आणि प्रत्यक्षातही तसेच घडले. ‘मी या विचारांकडे दुर्लक्ष करायचे कि आणखी काय करायचे ?’, असा माझ्या मनात प्रश्न होता.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : या विचारांचा अभ्यास करायचा आहे. ‘त्या बाळाचे नामकरण काय असावे ?’, याविषयी तुम्हाला पूर्वसूचनाच मिळाली होती; परंतु पूर्वसूचनेच्या पुढे कसे असते की, पूर्वसूचना मिळते, त्या वेळी तुमच्या मनाला कसे वाटते ? आणि पूर्वसूचनेनंतर नेमके घडते ? जर घडलेली घटना तुमच्या पूर्वसूचनेच्या विचारांशी मिळतीजुळती असेल, तर पुष्कळच छान; परंतु जर पूर्वसूचनेच्या विचारांच्या अगदी उलटेच घडत असेल, तर तो विचार सोडून द्यायचा. ‘त्या पूर्वसूचनेच्या विचाराचे जे व्हायचे, ते होऊ दे’, असा विचार करून तो विचार मनातून काढून टाकायचा. यापेक्षा स्वतःच्या साधनेकडे अधिक लक्ष देऊन साधनेची घडी नीट बसवणे, हे अधिक महत्त्वाचे आहे.