मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ (‘एल्.एन्.जी.’) बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या बस आगामी काळात नाशिक किंवा मुंबई मार्गावर धावण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत ५ डिझेल बसगाड्यांचे ‘एल्.एन्.जी.’ बसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
‘एल्.एन्.जी.’ची किंमत डिझेलच्या तुलनेत अल्प असल्याने एस्.टी. बस प्रवासाचा प्रति किलोमीटर ऑपरेटिंग खर्च न्यून होणार आहे. ‘एल्.एन्.जी.’च्या एका टाकीत बस ७०० ते ७५० कि.मी. पर्यंत धावू शकते, अशी माहिती परिवहन खात्यातील अधिकार्यांनी दिली आहे. पर्यावरण रक्षणासह पैशांचीही बचत होईल.