जुलै २०१९ मध्ये तक्रार प्रविष्ट !
पुणे – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या २१ वर्षीय बिसोवजित देबनाथ या तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी आणि १५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. १३ वर्षीय मुलीशी बिसोवजित याने ओळख केली. आमीष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून ती मुलगी गर्भवती राहिली. आधुनिक वैद्यांकडे गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तळेगाव पोलीस ठाण्यात जुलै २०१९ मध्ये तक्रार प्रविष्ट केली होती.