अनधिकृत बांधकामासंबंधी पी.एम्.आर्.डी.ए.प्रशासन सक्रीय !

पिंपरी – अनधिकृत बांधकामासंबंधी पी.एम्.आर्.डी.ए. प्रशासन सक्रीय झाले असून त्यांनी अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत १० सहस्र बांधकामांना त्यांनी नोटीस दिली आहे. (एवढी बांधकामे होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? याला उत्तरदायी अधिकार्‍यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक) पी.एम्.आर्.डी.ए.च्या हद्दीतील मालमत्ता धारकांनी अनुमती घेऊनच बांधकाम करावे. चालू असलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावे, असे आवाहन पी.एम्.आर्.डी.ए. प्रशासनाने केले आहे. या आदेशाचे पालन न करणार्‍यांवर प्रशासनाने गुन्हे नोंद केले आहेत. पुढील आठवड्यात कारवाईच्या अनुषंगाने बैठक होणार आहे. निवडणुकीचे कामकाज संपल्याने या विभागातील अधिकारी पुढील २ दिवसांत कामावर रुजू होतील. आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील कारवाई लवकरच करण्यात येईल, असे अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांनी सांगितले.