सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी करणारा आरोपी अटकेत !

आरोपीविरुद्ध नवी मुंबईमध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. आरोपी सुक्खा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे.

सिद्दीकींच्या मारेकर्‍यांकडून ३ पिस्तुल जप्त

१२ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा सिद्दीकी यांनी निर्घृण हत्या झाल्यानंतर बिष्णोई गटाच्या ४ जणांना पकडण्यात आले आहे. हत्येच्या आधी घंटाभर आरोपी वांद्रे पूर्व येथे होते.

महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार मनोहर भोईर तळोजा कारागृहात !

सरकारी कामात अडथळा आणल्याच्या १३ वर्षे जुन्या प्रकरणात सुनावणीसाठी वारंवार अनुपस्थित राहिल्याप्रकरणी भोईर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथे अल्पवयीन मुलावर ९ अल्पवयीनांचा अत्याचार !

अल्पवयीन मुलांनी अत्याचार करणे, तसेच युवकाने चोरी करणे, ही मुलांची स्थिती म्हणजे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम !

‘इमर्जन्सी’ चित्रपटाला केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र

हा चित्रपट इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. शीख समुदायाने याच्या प्रदर्शनाला विरोध केला होता.

पुणे येथे ५ घरे आणि १ दुकान आगीत भस्मसात

घोरपडे पेठेतील जोशी वाड्यात १७ ऑक्टोबरच्या पहाटे भीषण आग लागली. आग आटोक्यात आली असून जीवितहानी झाली नाही.

Johnson & Johnson Cancer : बेबी पावडरमुळे झाला कर्करोग : ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आस्थापन पीडित व्यक्तीला १२६ कोटी रुपये हानीभरपाई देणार !

अमेरिकन फार्मा आस्थापन ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चा भारतात मोठा व्यवसाय आहे आणि ते दीर्घकाळापासून देशात बेबी पावडरची विक्री करत आहे.

New Chief Justice : न्‍यायमूर्ती संजीव खन्‍ना होणार नवे सरन्‍यायाधीश !

सरन्‍यायाधीश चंद्रचूड १० नोव्‍हेंबर २०२४ या दिवशी निवृत्त होणार आहेत. सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांच्‍यानंतर न्‍यायमूर्ती संजीव खन्‍ना यांचे नाव ज्‍येष्‍ठता सूचीत आहे.

Plane Bomb Threat : देशांतर्गत जाणार्‍या २ विमानांमध्‍ये बाँबची धमकी !

धमकी देणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा केल्‍यास अशा प्रकारांना आळा बसेल ! समाजकंटक विमानांच्‍या संदर्भात वारंवार अशा धमक्‍या देतात, हे सरकारी यंत्रणांसाठी लज्‍जास्‍पद !

कोकणात कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथून वानर पकडण्याच्या कामाला प्रारंभ !

वानरांचा उपद्रव लक्षात घेऊन सरकारने त्यांना ‘उपद्रवी पशू’ म्हणून घोषित करावे. वानरांचा बंदोबस्त केल्याविना कोकण समृद्ध होणार नाही.