तळोजा – महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आणि उरणचे माजी आमदार मनोहर भोईर यांना तळोजा कारागृहात पाठवण्यात आले आहे. यामुळे महाविकास आघाडीचे जागावाटप घोषित होऊन पहिली उमेदवार सूची घोषित होण्याच्या आधीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या १३ वर्षे जुन्या प्रकरणात सुनावणीसाठी वारंवार अनुपस्थित राहिल्याप्रकरणी भोईर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.