न्यूयॉर्क : अमेरिकतील हिंदु खासदार तुलसी गॅबर्ड यांनी अलीकडेच न्यूयॉर्कमधील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. मंदिराला भेट दिल्यानंतर आनंद व्यक्त करतांना तुलसी गॅबर्ड म्हणाल्या, ‘‘मी येथे येऊन अतिशय भारावून गेले आहे आणि ज्या पद्धतीने माझे स्वागत केले गेले, त्याविषयी मी अत्यंत आभारी आहे.’’
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुलसी गॅबर्ड यांची राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. याआधी तुलसी गॅबर्ड यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला होता, ज्यामध्ये त्या हिंदु धर्माचा प्रचार करतांना दिसत होत्या.
तुलसी गॅबर्ड यांना हिंदु धर्माचा अभिमान आहे. त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदू आणि इतर अल्पसंख्य यांच्यावरील अत्याचारांचा सातत्याने निषेध केला आहे.