न्‍यायाधीश धनंजय निकम यांच्‍या निवासस्‍थानाची तपासणी !

न्‍यायाधीश धनंजय निकम

सातारा, १७ डिसेंबर (वार्ता.) – जामिनासाठी लाच मिळवण्‍याचा प्रयत्न केल्‍याने सातारा जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश धनंजय निकम यांच्‍यासह तिघांवर गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. संशयित आरोपी किशोर खरात हे मुंबई पोलीस दलामध्‍ये साहाय्‍यक फौजदार आहेत. न्‍यायाधीश धनंजय निकम यांच्‍या सातारा येथील निवासस्‍थानाची तपासणी करण्‍यात आली असून येथे संशयास्‍पद आढळून आले नाही.