‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराच्या रकमेत १ लाख रुपयांपर्यंत वाढ केल्याचे प्रकरण
नागपूर – ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारा’साठी सरकारने पुरवणी मागणीतून निधी उपलब्ध करून दिल्याविषयी आम्ही शासनाचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. महाकवी कालिदास यांच्या साहित्यकृतींनी केवळ भारतीय साहित्यास नव्हे, तर जागतिक साहित्याला नवा आयाम दिला. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी अशा प्रकारच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन स्वागतार्ह आहे. यामुळे संस्कृतचे अभ्यासक आणि साहित्यप्रेमी यांना प्रोत्साहन मिळेल. असे उपक्रम सातत्याने होण्यासाठी शासनाने अधिक पुढाकार घ्यावा आणि या सांस्कृतिक वारशाला नवसंजीवनी द्यावी. संस्कृत भाषेचे संवर्धन आणि प्रचार यांसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. संस्कृत भाषा आणि साहित्य जतन करण्यासाठी सरकारच्या या प्रयत्नांसाठी आम्ही आभारी आहोत. या पुरस्कार सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, असे मत प्रा. कविता होले यांनी व्यक्त केले आहे.