उपसभापती नीलम गोर्‍हे यांची घोषणा विधान परिषद सभापतीपदाची निवडणूक १९ डिसेंबरला !

डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

नागपूर, १७ डिसेंबर (वार्ता.) – मागील २ वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक १९ डिसेंबर या दिवशी होणार आहे, अशी घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी १७ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत केली. यंदाच्या अधिवेशनात विधान परिषदेच्या सभापतीची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार आता ही निवडणूक होणार आहे.

वास्तविक रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट २०२२ मध्ये संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे; मात्र आगामी राजकारणाच्या दृष्टीने हे पद भरले जाईल, अशी चर्चा चालू आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपकडे आहे, तर विधान परिषदेचे उपसभापतीपद हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.