सिंहगड रस्त्यावरील ३४ विक्रेत्यांना नोटीस !
पुणे – रस्त्यावर आणि पादचारी मार्गांवर श्री गणेशमूर्ती विक्रीची दुकाने मांडली जातात, त्यामुळे वाहतूककोंडी होते. अशा २२६ विक्रेत्यांना महापालिकेने नोटीस दिली आहे. यामध्ये सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक ३४ नोटिसा दिल्या आहेत. शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने ३ मंडळांना मान्यतेपेक्षा अधिक जागा व्यापल्याने त्यांनाही नोटीस दिली आहे.
गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून चालू होत आहे. श्री गणेशमूर्ती खरेदीसाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये श्री गणेशमूर्ती विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणामध्ये थाटली आहेत. महापालिकेकडून श्री गणेशमूर्ती विक्रीसाठी ज्या जागा निश्चित केल्या आहेत, तेथे दुकान उभे न करता विक्रेते त्यांच्या मर्जीनुसार मंडप घालून मूर्तींची विक्री करत आहेत.