दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बॅगेतून मृतदेह नेणार्‍या दोघांना अटक !;पनवेल येथे खड्ड्यांमुळे तरुणीचा मृत्यू !…

दादर रेल्वेस्थानकात २ मूकबधीर व्यक्ती मोठी बॅग तुतारी एक्सप्रेसध्ये चढवत होत्या. बॅगेचे वजन प्रचंड असल्याने त्यांना घाम फुटला होता. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना बॅग उघडण्यास सांगितले.

Alok Kumar VHP : भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी पावले उचलावीत ! – विहिंप

भारत सरकारवर हिंदु संघटनांनी यासाठी दबाव निर्माण करणेही तितकेच आवश्‍यक झाले आहे. केवळ बांगलादेशच नाही, तर भारतातील हिंदूंच्‍याही रक्षणासाठी पावले उचलणे आवश्‍यक आहे !

विशाळगड अतिक्रमण उद्रेक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २४ पैकी १७ हिंदूंना जामीन संमत !

तक्रारदाराच्या अधिवक्त्यांनी ७ जणांविषयी प्रत्यक्ष दर्शनी छायाचित्रे ‘व्हिडिओ स्टेटस’च्या माध्यमातून लावल्याचे न्यायालयात सांगितले.

बांगलादेशात अल्‍पसंख्‍यांकांना लक्ष्य केले जात आहे ! : S Jaishankar

बांगलादेशात वर्ष १९४७ पासूनच अल्‍पसंख्‍यांक म्‍हणजे हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्‍यामुळे त्‍या वेळी २८ टक्‍के असणारे हिंदू आता ८ टक्‍केही शिल्लक राहिलेले नाहीत.

‘फेडेक्स कॉलर’ किंवा अन्य प्रकारच्या भ्रमणभाष संपर्कातून स्वतःची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ?

प्रशासन, प्रसारमाध्यमे यांद्वारे समाजाला सतर्क केले जात असतांनाही अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढीस लागल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे याविषयी सतर्क रहाणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवडच्या पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करू ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुळा आणि पवना या नद्यांना पूर आल्यानंतर नदीकाठच्या रहिवाशांना प्रतिवर्षी स्थलांतरित व्हावे लागते. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षित जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा पर्याय काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांना दिले.

उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एरंडवणे येथील २ डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंद !

वजन अल्प करण्याच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे गेल्या २ वर्षांपासून १ अभियंता महिला अंथरुणाला खिळून आहे. या प्रकरणी डॉ. प्रशांत यादव आणि डॉ. स्वप्नील नागे यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘सेल्फी’ काढण्याच्या नादात युवती दरीत कोसळली !

तरुण-तरुणी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेल्फी काढतात. यामुळे पोलीस आणि प्रशासन यांसह सर्वांनाच अडचणीत आणतात, याचे भान त्यांनी ठेवणे आवश्यक आहे !

पुणे येथे भोर, सिंहगड रस्ता आदींसह ७ ठिकाणी विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी पार पडली मूक निदर्शने !

मुसळधार पाऊस असूनही धर्मप्रेमींचा आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ! पुणे, ६ ऑगस्ट (वार्ता.) – विशाळगडासह छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त व्हावेत आणि हिंदूंवर गुन्हे नोंद करून करण्यात आलेली कारवाई रहित करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ऑगस्ट या दिवशी शिवतीर्थ, चौपाटी, भोर, पुणे येथे मूक आंदोलन घेण्यात आले. या वेळी भोर व्यापारी संघटनेचे श्री. … Read more

सरकारला शेवटची संधी, आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील ! – मनोज जरांगे यांची चेतावणी

विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे. आम्हाला राजकारणात उतरायचे नाही; मात्र सरकारने आता आमची मागणी मान्य न केल्यास दुसरा पर्याय नाही. ही सरकारला शेवटची संधी आहे.