नवी देहली – बांगलादेशात(Bangladesh) एकेकाळी ३२ टक्के हिंदू (Hindu) होते; पण आज तिथे ८ टक्के हिंदू आहेत. त्यांच्यावरही आक्रमणे झाली, तर सार्या जगाने विचार करायला हवा. हस्तक्षेप व्हायला हवा. भारत हा त्यांचा शेजारी देश आहे. आपले दायित्व अधिक आहे, आपण डोळे बंद करू शकत नाही. भारत सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत आणि हिंदूंच्या सुरक्षेची निश्चिती करावी. बांगलादेशच्या अंतरिम सरकारनेही कर्तव्य बजावावे, अशी आम्ही अपेक्षा करू, अशी प्रतिक्रिया विश्व हिंदु परिषदेचे (VHP) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार(Alok Kumar) यांनी व्यक्त केली आहे.
आलोक कुमार म्हणाले की, शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे सरकार पडले, त्यांना देश सोडावा लागला, आंदोलनाचा उद्देश साध्य झाला; परंतु आय.एस्.आय.च्या काही घटकांना ही चळवळ अल्पसंख्यांकांकडे वळवायची आहे आणि त्याअंतर्गत त्यांनी बांगलादेशातील प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यांकांच्या व्यावसायिक इमारती, घरे आणि प्रार्थनास्थळे यांनी हानी केली आहे. २ हिंदु नगरसेवकांची हत्या, काली मंदिर पेटवले. इस्कॉन(ISCON) मंदिरही जाळले, हे चांगले नाही.
#WATCH | On the situation in Bangladesh, Vishva Hindu Parishad (VHP) International Working President, Alok Kumar says, “Anarchy and lawlessness in Bangladesh is also an issue of concern for India. It is a big concern for us that harm has been caused to minorities including Hindus… pic.twitter.com/vKOhjhF7xU
— ANI (@ANI) August 6, 2024
संपादकीय भूमिकाभारत सरकारवर हिंदु संघटनांनी यासाठी दबाव निर्माण करणेही तितकेच आवश्यक झाले आहे. केवळ बांगलादेशच नाही, तर भारतातील हिंदूंच्याही रक्षणासाठी पावले उचलणे आवश्यक आहे ! |