जगातील पहिलीच मोटारसायकल
(सी.एन्.जी. म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस)
पुणे – बजाजने ‘फ्रीडम १२५ सी.एन्.जी.’ मोटारसायकल बाजारात आणली आहे. ही जगातील पहिली सी.एन्.जी. मोटारसायकल आहे. ‘फ्रीडम १२५’ची किंमत ९५ सहस्र रुपयांपासून चालू होते. १२५ सीसीमध्ये (इंजिनची क्षमता) हे एकमेव इंजिन आहे, जे सी.एन्.जी. आणि पेट्रोल यांवर काम करते. इंजिनला अशा प्रकारे ‘ट्यून’ केले आहे की, ते सर्व प्रकारच्या हवामानात चांगली कामगिरी करू शकते. ‘२ किलोचा सी.एन्.जी. सिलेंडर असून तो पूर्ण टाकीवर २०० कि.मी. चालेल, असा दावा आस्थापनाने केला आहे. २ लिटरच्या पेट्रोलच्या टाकीमुळे मोटारसायकल १३० कि.मी. धावेल. ही बाईक ३३० कि.मी. (सी.एन.जी + पेट्रोल) पर्यंत धावेल. पेट्रोल आणि सी.एन्.जी.वर धावणार्या या मोटारसायकलला ग्राहकांची मोठी मागणी आहे.