पुणे – ‘समग्र शिक्षा अभियानां’तर्गत शाळेच्या प्रारंभी म्हणजे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश दिले जात होते. यंदा शाळा चालू होऊन ३ महिने झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एका गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. या वर्षी गणवेशाच्या पेहरावामध्ये पालट केला आहे. या पालटाला ‘अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटने’ने विरोध केला आहे. हा गणवेश स्वीकारण्यास शाळा व्यवस्थापन नकार देत आहेत.
उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक साजिद अहमद म्हणाले, ‘‘उर्दू शाळांतील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे पूर्ण पॅंट, सलवार, स्कार्फ मिळायला हवेत. राज्यातील उर्दू माध्यमांच्या शाळांनी ‘समग्र शिक्षा अभियाना’च्या या गणवेश वाटप योजनेला विरोध केला आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांनी याविषयीचा ठराव संमत केला आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना पूर्वीचा गणवेश उपलब्ध करून द्यावा.’’ (नव्या गणवेशाला विरोध करणारी उर्दू शिक्षक संघटना हिजाबला विरोध का करत नाही ? – संपादक)