शिल्लेगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील पोलिसांकडून वॉरंट प्रकरणी २७ जण अटकेत !

९ जणांचा जामीन नाकारला; हर्सूल कारागृहात रवानगी !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – अजामीनपात्र वॉरंट प्रलंबित असल्याच्या कारणाने शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील २७ जणांना पोलिसांनी २० जुलै या दिवशी कह्यात घेऊन अटक केली. पहाटे वाँरटमध्ये एकत्रित अटक मोहीम राबवून विविध ठिकाणांहून या सर्वांना अटक केली आहे. दुपारी सर्वांना गंगापूर न्यायालयासमोर उपस्थित केले होते. यातील गंभीर गुन्ह्यांत वेळोवेळी समन्स बजावूनही सतत अनुपस्थित रहाणार्‍या ९ जणांचे जामीन आवेदन न्यायालयाने नाकारले. यामुळे त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली, तसेच किरकोळ वॉरंटमधील १८ जणांना जामीन मिळाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील वेगवेगळ्या गावांतील तब्बल ३८ व्यक्तींचे अजामीनपात्र वाँरट प्रलंबित होते. यामधील बरेच आरोपी हे मागील ७-८ वर्षांपासून समन्स दिनांकास उपस्थित रहात नव्हते. याविषयी धरपकड मोहीम राबवली. वेगवेगळ्या गावांतील वाळू चोरी, चोरटी मद्यविक्री, हाणामारी, चेक न वठणे इत्यादी गुन्ह्यांमधील वॉरंट निघालेल्यांचा शोध घेतला.