कोल्हापूर – कागल तालुक्यातील ‘विश्वात्मक गुरुदेव जंगली महाराज आश्रम’, गोरंबे येथील मठाधिपती प.पू. अमृतानंद महाराज यांना १३ जुलैला देवाज्ञा झाली. त्यांचे पार्थिव आश्रम परिसरातच दहन करण्यात आले. १४ जुलैला सकाळी ९ वाजता आरती आणि कलशपूजन झाले, तर १५ जुलैला सकाळी ९ ते दुपारी १२.३० या कालावधीत आदरांजली आणि मान्यवर, भक्तांनी मनोगत व्यक्त केले. यात प्रामुख्याने विष्णुपंत पोवार, रामदास महाराज, संजीव कुलकर्णी, सुभाष शिंत्रे महाराज, एकनाथ महाराज, लोखंडे महाराज, ‘भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समिती’चे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ यांसह अन्यांचा समावेश होता. दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद झाला. दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजता भागातील भजनी मंडळ यांचे भजन आणि शास्त्रीय गायन सेवा पार पडली.