Indian Students Died Abroad : गेल्या ५ वर्षांत विदेशात ६३३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

कॅनडामध्ये सर्वाधिक १७२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर अमेरिकेत १०८, ब्रिटनमध्ये ५८, ऑस्ट्रेलियात, ५७, रशियात ३७ आणि जर्मनीत २४ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

Pune Rain Prediction : जुलै महिन्यात पूर आणि अतीवृष्टी यांमुळे मोठी हानी झाली !

ज्योतिष शास्त्राला थोतांड म्हणणार्‍या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

थोडक्यात पण महत्वाचे : शिळफाटा येथे खड्ड्यामुळे अपघात !…. कांदिवली परिसरात सोनेरी कोल्हा आढळला !

शिळफाटा रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीचा तोल गेला. या दुचाकीला भरधाव वेगातील चारचाकीने धडक दिल्याने गंभीर घायाळ झालेल्या कामोठे येथील सागर मिसाळ याचा मृत्यू झाला.

छत्रपती संभाजीनगर येथील स्वराज्य प्रेरणादिनाच्या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाने अनुमती नाकारली !

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील गजापूर घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती असल्याने पोलिसांनी दौलताबाद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पुरातत्व विभाग आणि पोलीस यांनी आधीच अनुमती नाकारली

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडचा पाकिस्तान केल्यानंतरही छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती ! – अंबादास दानवे

अंबादास दानवे यांनी २४ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्री देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पत्रानंतर अवघ्या काही घंट्यांतच शासनाने मंत्री अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली.

गडचिरोली येथे भ्रमणभाषच्या विजेरीच्या साहाय्याने गर्भवतीची प्रसूती !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही गर्भवतीवर अशी वेळ येणे दुर्दैवी !

पुणे विद्यापिठाच्या परीक्षा पावसाने रहित

पुणे – नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात अतीवृष्टी आणि मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आल्याने पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना २६ जुलै या दिवशी अतीवृष्टीची सुटी घोषित केली होती. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाने मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशालेच्या २६ आणि २७ जुलै या दिवशी होणार्‍या परीक्षा रहित केल्या आहेत. रहित झालेल्या … Read more

गाढवाला गुळाची चव काय ?

‘हिंदु धर्माच्या विरोधात साहित्यिक, बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादी बडबडतात. तेव्हा ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, या म्हणीची आठवण येते !’

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करा !

मंदिर चालवणे, हे सरकारचे काम नाही. सरकार केवळ व्यवस्थापन पाहू शकते. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी
मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करावे, असा युक्तीवाद भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला.