गडचिरोली – येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने वीज गेली होती. एटापल्ली तालुक्यातील अतीदुर्गम गावात एका गर्भवतीला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते; पण मुसळधार पावसामुळे तेथील वीज गेल्याने प्रभारित केलेला दिवा (चार्जिंग बल्ब) आणि भ्रमणभाषची विजेरी यांच्या साहाय्याने तिची प्रसूती करण्यात आली. माता आणि बाळ सुखरूप आहेत.
संपादकीय भूमिका :स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही गर्भवतीवर अशी वेळ येणे दुर्दैवी ! |