पुणे – नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात अतीवृष्टी आणि मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आल्याने पुणे जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना २६ जुलै या दिवशी अतीवृष्टीची सुटी घोषित केली होती. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाने मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशालेच्या २६ आणि २७ जुलै या दिवशी होणार्या परीक्षा रहित केल्या आहेत. रहित झालेल्या परीक्षेचे पुन्हा नियोजन करून नवीन वेळापत्रक लवकरच विद्यापिठाच्या संकेतस्थळावर ठेवले जाईल, अशी माहिती विद्यापिठाच्या परीक्षा विभागाने दिली आहे. विद्यापिठाच्या उर्वरित परीक्षा नियोजित वेळापत्रकांन्वये होतील. या संदर्भात काही शंका असल्यास संबंधित महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी परीक्षा विभागाशी संपर्क साधावा. सर्व संलग्नित परीक्षा केंद्राचे प्राचार्य, समन्वयक आणि महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांनी या सूचनेची नोंद घेऊन संबंधित विद्यार्थ्यांना अवगत करावे, असे आवाहन विद्यापिठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.