२७ जूनपासून पावसाळी अधिवेशनास प्रारंभ !
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून चालू होत आहे. २८ जून या दिवशी राज्याचा उर्वरित काळासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून चालू होत आहे. २८ जून या दिवशी राज्याचा उर्वरित काळासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी अवैध पब्जवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच अमली पदार्थांशी निगडीत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारी सोहळ्यावर इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्याचे संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातत्याने रसायनमिश्रित पाणी थेट नदीत सोडले जात आहे.
नाशिकच्या महापालिका आयुक्तांकडून या पालखीचे भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले. या पालखीचा रिंगण सोहळा या वेळी पार पडला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १२० मधील विद्यार्थ्यांना ‘आयटीच’ या संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने शिक्षकांचा पुरवठा करण्यात आला आहे
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (‘एम्स्’मध्ये) कार्डियाक ॲनेस्थेसिया तज्ञ १ महिन्याच्या सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे १५ दिवसांपासून हृदयाच्या बायपास शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत.
या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये नि:स्वार्थी सेवा करत असलेल्या महनीय लोकांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मंगल भोईर म्हणाले की, मुलांनी या आर्थिक साहाय्याची जाणीव ठेवली पाहिजे. आई – वडील यांच्या नंतर ज्यांनी आपल्या आयुष्यात विविध टप्प्यांवर साहाय्य केले, त्यांना कधीही विसरता कामा नये.
पाऊस संपल्यावर कोकणातील नद्या कोरड्या पडतात. स्वतःचे जलस्रोत निर्माण झाल्यास येथील नद्याही बारमाही वाहतील.
हिंदू लहान वयात त्यांच्या मुलींना भगवद़्गीता का शिकवत नाहीत ? ‘परधर्मापेक्षा स्वधर्म श्रेष्ठ आहे’, याची शिकवण भगवद़्गीतेमध्ये देण्यात आली आहे. हे शिक्षण मिळाले, तर हिंदु युवती लव्ह जिहादला बळी पडणार नाहीत. कायद्याने नाही, तर संस्कार आणि संस्कृती यांमुळेच लव्ह जिहादला रोखता येईल.