|
नागपूर – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (‘एम्स्’मध्ये) कार्डियाक ॲनेस्थेसिया तज्ञ १ महिन्याच्या सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे १५ दिवसांपासून हृदयाच्या बायपास शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत. सुटीवर जाण्यापूर्वी भूलतज्ञाने एक महिन्यापूर्वीच एम्स प्रशासनाकडे अर्ज केला होता; पण तरीही प्रशासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही. (शस्त्रक्रियांच्या दृष्टीने उपाययोजना न काढता निष्क्रीय रहाणार्या संबंधितांवर कारवाईच करायला हवी ! – संपादक) अनेक रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.
‘भूलतज्ञ सुट्टीवर गेल्याने बायपास शस्त्रक्रिया थांबणे चुकीचे आहे. याविषयी प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करायला सांगितले आहे’, असे प्रतिपादन ‘एम्स’चे अध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी केले आहे. (हे आता सांगून काय उपयोग ? भूलतज्ञाचा अर्ज आल्यावर कृती का केली नाही ? – संपादक)