सिन्नर (नाशिक) येथे संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रिंगण सोहळा !

सिन्नर (नाशिक) – संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे नाशिक येथे २५ जूनला आगमन झाले. या वेळी या पालखीचे येथे भव्य स्वागत करण्यात आले. पालखीमध्ये सहस्रो वारकर्‍यांनी सहभाग घेतला होता. नाशिकच्या महापालिका आयुक्तांकडून या पालखीचे भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले. या पालखीचा रिंगण सोहळा या वेळी पार पडला. पालखीवर अनेक वारकर्‍यांना पुष्पवर्षाव केला. अनेक वारकरी या रिंगण सोहळ्यात ताल धरून नाचत-गात होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.