नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १२० मधील विद्यार्थ्यांना ‘आयटीच’ या संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने शिक्षकांचा पुरवठा करण्यात आला आहे; पण हे शिक्षक योग्य प्रकारे शिकवत नसल्याची तक्रार करत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढला होता.
शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न देणे, सकस आहारामध्ये येणार्या खिचडीचे विद्यार्थ्यांनाच वाटप करण्यास लावणे, शिक्षकांना ‘टिचर’ किंवा ‘सर’ ऐवजी ‘दीदी’ किंवा ‘दादा’ म्हणण्यास सांगणे असे प्रकार होत आहेत. शिक्षक वर्गात मुलांना अभ्यास देऊन स्वतः भ्रमणसंगणक (लॅपटॉप) घेऊन बसतात. पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी पालकांना त्यांचे म्हणणे शिक्षण अधिकार्यांना सांगण्यास सांगितले. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाचे उपायुक्त संघरत्न खिल्लारे यांना दिले आहेत.
संपादकीय भूमिकाविद्यार्थ्यांवर मोर्चा काढण्याची वेळ येणे दुर्दैवी ! |