माहिती अधिकाराखाली उघड झाली माहिती
पणजी, १२ जून (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने हल्लीच गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुमनीविना कार्यरत असलेल्या हणजूण-कायसूव समुद्रकिनारपट्टी भागातील १७५ अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांना टाळे ठोकण्याचा आदेश दिला होता. आता माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यात सुमारे १ डझन प्रसिद्ध क्लब, मद्यालये आणि उपाहारगृहे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुमतीविना कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये ‘सिंक नाईट क्लब’, ‘शॉबार’, ‘कोहीबा’, ‘सोय इन कांदोळी’, ‘सोरा-द व्हिलेज पब’, ‘सेक इन आसगाव’, ‘सोहो फोंटीनस इन पणजी’ आदी प्रसिद्ध क्लबचा समावेश आहे. स्थानिक रहिवासी आत्माराम गडेकर यांनी या आस्थापनांविषयी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार नोंदवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याची चेतावणी आत्माराम गडेकर यांनी दिली आहे.
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित क्लब, मद्यालये किंवा उपाहारगृहे यांच्याकडे व्यवसाय करण्याची अनुमती नाही किंवा या आस्थापनांची माहिती मंडळाकडे उपलब्ध नाही. (गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ अनुमतीविना चालू असलेले क्लब आणि उपाहारगृहे यांची माहिती देते; पण कारवाई करत नाही, असे का ? – संपादक) यामुळे ही आस्थापने पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. आता या आस्थापनांनाही टाळे ठोकले जाण्याची शक्यता आहे.
संपादकीय भूमिका
|