सांगली, ११ जून (वार्ता.) – ‘जिल्ह्यातील पशूधनास आवश्यक चारा उपलब्ध व्हावा या दृष्टीने कृषी, महसूल, पशूसंवर्धन आणि जिल्हा परिषदेच्या वतीने चारा टंचाई जाणवणारे तालुके, तसेच गावे यांना प्रत्यक्ष भेट देऊन चारा उपलब्धतेविषयी शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे करून याविषयीचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा’, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ११ जून या दिवशी दिले. वर्ष २०२३ मध्ये दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील जनावरांसाठी चारा आगार चालू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.