मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चालू !
जालना – मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ‘आमरण उपोषणा’ला ८ जूनपासून प्रारंभ झाला. पोलिसांकडून या उपोषणाला अनुमती नाकारण्यात आली आहे; मात्र तरीही मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. ‘मी उपोषण करणार असून सगेसोयरेची अधिसूचना काढावी’, अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.
छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून त्यांनी ‘आमरण उपोषणा’ला प्रारंभ केला. ते म्हणाले की, आता मराठा आरक्षण न दिल्यास विधानसभेत मी नाव घेऊन उमेदवार पाडणार आहे. शिवाय मराठा आरक्षण न दिल्यास २८८ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. यामध्ये सर्व जाती धर्माच्या उमेदवारांचा समावेश असेल. याला उत्तरदायी सरकार असेल. त्यानंतर सरकारला बोलायला जागा रहाणार नाही. मराठा समाजाने शांत रहायचे आहे.