चिनी अभियंत्यांची हत्या रोखण्यासाठी चीनचे तालिबानला आमीष !
चीनने तालिबानला मोठे आमीष दाखवले आहे की, जर त्याने ‘टीटीपी’ला आक्रमण करण्यापासून रोखले, तर चीन अफगाणिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करेल.
चीनने तालिबानला मोठे आमीष दाखवले आहे की, जर त्याने ‘टीटीपी’ला आक्रमण करण्यापासून रोखले, तर चीन अफगाणिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करेल.
एखाद्या गरीब नि असाहाय्य देशाला स्वत:च्या कह्यात घेण्यासाठी चीन अशीच खेळी करतो. भारतापासून दूर जात असलेल्या मालदीवचा आत्मघात निकट आला आहे, हेच या प्रातिनिधिक घटनेतून लक्षात येते !
देवभूमी उत्तराखंडमधून गंगामाता संपूर्ण देशात वाहू लागते, अगदी त्याप्रमाणेच समान नागरी कायद्याची ‘गंगा’ उत्तराखंडमधून वहायला आरंभ झाला आहे. संरक्षण आणि विश्वास यांवर आधारित असलेला हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले.
मुलांना सामाजिक माध्यमापासून (सोशल मीडियापासून) दूर ठेवणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा दीर्घकाळ वापर करणे मुलांसाठी चांगले नाही. सामाजिक माध्यम मुलांसाठी फार धोकादायक आहे, असे विधान ‘एक्स’चे (पूर्वीच्या ट्वीटरचे) सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी एका परिषदेत बोलतांना केले.
चीनच्या तालावर नाचून भारताशी शत्रूत्व ओढवून घेणार्या मालदीवला आता भारतानेही ‘रुपे कार्ड’ सेवा चालू करण्यास विरोध करून त्याला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे !
आता नक्षलवादाची कीड समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षात !
‘जमावाला कोणताही धर्म नसतो’, अशी टिप्पणी करत राजस्थान उच्च न्यायालयाने एका प्रकरणात १८ जणांना जामीन संमत केला आहे. हे प्रकरण बाबू महंमद विरुद्ध राजस्थान सरकार असे आहे.
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्यांना चपराक ! देशातील बहुतेक मुसलमानबहुल भागांत पोलिसांवर आक्रमणे होतात. ही स्थिती पालटण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे !
देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने पाश्चात्त्य शिक्षणावर आधारित अभ्यासक्रम लागू केला. या अभ्यासक्रमात नैतिक मूल्यांना स्थान नसल्यामुळेच सद्यःस्थितीत समाजाचे झालेले अध:पतन हे काँग्रेसचे पाप आहे. याला छेद देऊन भारतीय संस्कृतीवर आधारित अभ्यास लागू करण्याचा सरकारचा निर्णय स्तुत्य आहे !
बंगालमधील हिंसाचार रोखू न शकणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !