मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे चोरीचा माल परत घेण्यासाठी गेलेल्या तमिळनाडू पोलिसांवर मुसलमानांचे आक्रमण

२ पोलीस उपनिरीक्षक घायाळ  

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – लुटलेला माल परत मिळवण्यासाठी येथील पाकबाडा भागात गेलेल्या तमिळनाडू पोलिसांवर गुन्हेगारी वृत्तीच्या मुसलमानांनी आक्रमण केले. यात २ पोलीस उपनिरीक्षक घायाळ झाले. या आक्रमणाच्या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून काही जणांना अटक केली.

या ४ जणांना अटक करण्यात आली

१. ६ एप्रिलला तमिळनाडूतील बिल्लुपूरम् येथे रहाणार्‍या गीता देवी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून दरोडा घातला होता. तमिळनाडू पोलिसांनी केलेल्या अन्वेषणातून काही जणांना अटक केली होती. या चोरांनी सांगितले की, त्यांनी लुटलेला माल पाकबाडा, मुरादाबाद येथील एका सराफ व्यापार्‍याला विकाला आहे.

२. यानंतर तमिळनाडू पोलिसांनी पाकबाडा पोलिसांशी संपर्क साधला. तमिळनाडू पोलिसांचे पथक पाकबाडा येथील सराफ बाजारातील रहिवासी अकबर आणि युसूफ यांच्या दुकानात पोचले. पोलिसांनी दुकानाची झडती चालू केली असता अन्य व्यापार्‍यांनी विरोध केला. काही लोकांनी पोलिसांना शिवीगाळ केली. आवाज ऐकून गर्दी जमली. यानंतर जमावाने पोलिसांवर आक्रमण केले.

३. या आक्रमणाची माहिती पाकबाडा पोलीस ठाण्यात दिल्यावर फौजफाटा घेऊन वरिष्ठ अधिकारी तेथे पोचले. तोपर्यंत या आक्रमणात पोलीस उपनिरीक्षक कुलदीप तोमर आणि आकाश त्यागी घायाळ झाले. पोलीस फौजफाटा आल्यानंतर आक्रमण करणारे पळून घेतले. या वेळी ४ जणांना अटक करण्यात आली.

४. पोलिसांनी अकबर, युसूफ, फरजान, युनूस, अब्दुल गनी, वसीम, हनिफ मिड्डा, शायरा बानो, हीना परवीन आणि ६ अनोळखी पुरुष अन् महिला यांच्याविरुद्ध दंगल, सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, पोलिसांवर आक्रमण करणे आदी कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्‍यांना चपराक !
  • उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नये, असे जनतेला वाटते !
  • देशातील बहुतेक मुसलमानबहुल भागांत पोलिसांवर आक्रमणे होतात. ही स्थिती पालटण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे !