सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ७ नक्षलवादी ठार !

१० ते १२ नक्षलवादी घायाळ !

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेजवळील दंतेवाडामध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये ७ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले, तसेच सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत १० ते १२ नक्षलवादी घायाळ झाले. या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

सध्या छत्तीसगडमध्ये विशेष मोहीम पथक, जिल्हा राखीव दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल आणि ‘कोब्रा कमांडो’ यांच्यासह अनुमाने १ सहस्र सैनिकांचे पथक नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम राबवत आहेत. अलीकडेच कांकेर, बस्तर आणि विजापूर येथे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी मारले गेले. या कारवाईत काही सैनिकही घायाळ झाले आहेत.

संपादकीय भूमिका

आता नक्षलवादाची कीड समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षात !