नंदीग्राम (बंगाल) येथे भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष

भाजपच्या महिला कार्यकर्तीचा मृत्यू, तर ७ जण घायाळ

नंदिग्राम मध्ये दंगलखोरांनी लावलेली आग

नंदीग्राम (बंगाल) – येथे २२ मेच्या रात्री भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर पक्षाचे ७ कार्यकर्ते घायाळ झाले. राठीबाला आडी (वय ५६ वर्षे) असे भाजपच्या मृत महिला कार्यकर्तीचे नाव आहे. ही घटना नंदीग्राममधील सोनचुरा गावात घडली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धारदार शस्त्रांंनी आक्रमण केल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथे रास्ता बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध केला.

पूर्व मेदिनीपूरसह जंगलमहाल जिल्ह्यांतील ८ जागांवर २५ मे या दिवशी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच या हिंसाचाराच्या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे.

संपादकीय भूमिका

बंगालमधील हिंसाचार रोखू न शकणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !