Uniform Civil Code : उत्तराखंडमधून समान नागरी कायद्याची ‘गंगा’ वहाण्यास प्रारंभ ! – मुख्यमंत्री धामी

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

नवी देहली – देवभूमी उत्तराखंडमधून गंगामाता संपूर्ण देशात वाहू लागते, अगदी त्याप्रमाणेच समान नागरी कायद्याची ‘गंगा’ उत्तराखंडमधून वहायला आरंभ झाला आहे. संरक्षण आणि विश्‍वास यांवर आधारित असलेला हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले. ते एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होते.  धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचे आश्‍वासन देणे, ही लोकशाहीची हत्या आहे, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.