कोंढवा (पुणे) येथे केलेल्या कारवाईत २३ म्हशी आणि रेडकू यांची सुटका !

(प्रतिकात्मक चित्र)

पुणे – कडनगरवरून कोंढवा येथे १५ मे या दिवशी म्हशींची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती गोरक्षक राहुल कदम यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी थांबले असता एक आयशर गाडी कोंढव्याच्या दिशेने भरधाव वेगाने येतांना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून गाडीचालक इरफान सौदागर याच्याकडे चौकशी केली असता त्यामध्ये ११ म्हशी आणि १२ रेडकू होते. (गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधांवर जरब बसेल असा धाक पोलीस निर्माण करणार का ? – संपादक) पोलिसांच्या साहाय्याने म्हशींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी राहुल कदम यांनी तक्रार दिली आहे.