पुणे-सोलापूर रस्त्यावर होर्डिंग कोसळले !

पुणे-सोलापूर रस्त्यावर कोसळेले होर्डिंग  

पुणे – पुणे-सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट पथकर नाक्याजवळील गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग कार्यालयाच्या समोर कोसळले. यामुळे दुचाकी, चारचाकी यांसह बँड वादकाच्या गाडीचीही हानी झाली आहे. मिरवणुकीसाठी आणलेल्या घोड्यावर होर्डिंग पडल्यामुळे घोडा गंभीर घायाळ झाला आहे.